विनेश तुझं कौतुक करावं तितकं थोडंच आहे

विनेश तुझं कौतुक करावं तितकं थोडंच आहे या व्यवस्थेने ज्या सिस्टीमने काही दिवसांपूर्वी तुला या भारताच्या रस्त्यांवरती फरफट ओढत नेल तुझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. सत्तेच्या मस्तीत धुंद असणाऱ्या आणि स्वतःला प्रधान सेवक म्हणून घेणाऱ्यांनी….. भारताच्या लेकीचा आवाज ऐकला नाही… उलट पाशवी , राक्षसी पुरुषी अहंकाराने माजलेल्या आपल्या अनुयायांच्या पाठीशी उभे राहणं पसंत केल…..
आज तू ऑलम्पिक च्या आखाड्यात प्रतिस्पर्ध्याला चितपट नाही केलं तर या देशातील.. राज सत्तेच्या उन्मदाला चितपट केलस ..
एका स्त्रीच्या अंगी असलेली जिद्द , चिकाटी , संयम , आणि सहनशीलता .. याचा सर्वश्रेष्ठ उदाहरण आहेस तू… खरंच आदिशक्ती आहेस तू… तुझा पदक निश्चित झालं.. आज संपूर्ण देशामध्ये आनंदाचे वातावरण आहे… परंतु तुझ्या विचारांना हाणून पाडणाऱ्या प्रत्येकाला , तुझा आवाज दाबू पाहणारा प्रत्येकाला तू तुझ्या कृतीनं तुझ्या विजयाने निरुत्तर केलस उद्या तुझ्या स्वागताला सुद्धा मान खाली घालून याचं निर्लज्ज लोकांना उभाच राहावं लागेल याच्यातच तुझा खरा नैतिक विजय दडलेला आहे !!!
भारत माता की जय
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत