अखेर अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर ; मात्र 2 जून रोजी करावं लागणार आत्मसमर्पण.

नवी दिल्ली : लोकशाही वाचवण्यासाठी कार्य करणाऱ्या आणि बलाढ्य हुकुमशाही कडे वाटचाल करत असलेल्या शक्तिं विरूध्द काम करणाऱ्या लोकांना बळ देणारा निकाल काल आला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीत आधीच ED या तपास यंत्रणेने ताब्यात घेतले होते व त्यांची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली होती. मात्र काल कोर्टाने कांहीं अटी शर्थी लावून निवडणूक कालावधी पुरता तरी अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केल्याने आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते खुश आहेत.
अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केलाय. 2 जून रोजी अरविंद केजरीवाल यांना पुन्हा पोलिसांकडे आत्मसमर्पण करावं लागणार आहे. मात्र आता दिल्लीच्या निवडणुकीआधी केजरीवाल बाहेर आल्याने आम आदमी पार्टी आणि इंडिया आघाडीसाठीसुद्धा जमेची बाजू ठरलीय. अरविंद केजरीवाल यांना प्रचार करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मोकळीक दिली आहे. केजरीवाल निवडणूक प्रचार करु शकतात, पण मद्य धोरण प्रकरणावर बोलू शकणार नाहीत, दिल्लीच्या बाहेर जायचं असल्यास तपास यंत्रणांना सांगावं लागेल, दोन जूनला आत्मसमर्पण करावं लागेल अशा अटी त्यांच्यासमोर ठेवण्यात आल्यात.
दिल्लीमध्ये 25 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. दिल्लीत लोकसभेच्या 6 जागा आहेत. तर पंजाबमध्ये 13 जागांसाठी 1 जूनला मतदान होणार आहे. आणि हे मतदान होईपर्यंत केजरीवाल बाहेर असणार आहेत. देशात लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले आहेत. त्यादरम्यान केजरीवाल तुरुंगातच होते.
तिहार तुरुंगातून बाहेर आलेल्या केजरीवाल यांच्या स्वागतासाठी आपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना केजरीवाल यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. देशाता आता हुकुमशाहीचे दिवस संपणार आहेत, असं केजरीवाल यांनी म्हटलं.
21 मार्चला अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. तर 10 मे रोजी केजरीवालांना अंतरिम जामीन मंजूर झालाय. मागील तीन टप्पे ते जेलमध्ये असल्याने आता मात्र त्यांच्या सभांचा धडाका पाहायला मिळेल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत