देश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपान

सुनीता विलियम्स स्पेस स्टेशन वर अडकून आहे का ?

एका वाक्यात उत्तर –
ती अडकलेली नसून स्पेस स्टेशन वर सुखरूप पणे थांबलेली आहे आणि परतीच्या प्रवासाची वाट बघत आहे.


सुनीता विलियम्स आणि तिचा सहकारी ऍस्ट्रोनॉट बॅरी विल्मोर Barry Wilmore हे दोघे नासा च्या Starliner’s Crew Flight Test (CFT) मिशन तर्फे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वर गेले.

6 जून ला ते बोईंग स्पेस कंपनीने बनविलेल्या नव्या स्टारलाइनर 1 या यानातून ते दोघे स्पेस स्टेशन वर पोहोचले. त्यांची मिशन ही केवळ एक आठवड्याची होती आणि ते ठरल्या प्रमाणे 13 जून रोजी याच स्टारलाइनर यानातून परत येणार होते. पण आता त्यांना तिथे जाऊन 2 महिने झाले आहेत.

फोटो मध्ये खाली दाखवलेले स्टारलाइनर यान हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ला ज्या ठिकाणी जोडले गेले आहे तो भाग लाल बाणाने दाखवला आहे.

यानातून सुनीता आणि तिचा सहकारी ऍस्ट्रोनॉट हे दोघे सुखरूप पणे स्पेस स्टेशन वर गेले. तिथे जात असतानाच या स्टारलाइनर यानाच्या मागे लावलेल्या छोट्या रॉकेट मोटर पैकी काही Reaction Control System (RCS) thruster मोटर मध्ये तांत्रिक बिघाड झाला असे त्यांना समजले.

नासा चे हे नवीन यान पहिल्यांदाच जात असल्याने सर्वात अनुभवी पायलट म्हणून सुनीता आणि तिच्या सहकार्याची कमांडर म्हणून निवड झाली होती.

यानाचे हुबेबुब Backup ship मॉडेल पृथ्वीवर बोईंग स्पेस कंपनी च्या टेस्ट लॅब मध्ये असल्याने यानात नेमका काय बिघाड झाला आणि त्याला दुरुस्त कसे करायचे किंवा त्यावर दुसरा काय उपाय आहे का हे सर्व टेस्टिंग करण्यात हा सगळा मधला वेळ जात आहे.

यान नवे असल्याने असे काहीतरी प्रॉब्लेम येणार हे आधीच माहती असल्याने मोठ्या प्रमाणात गोंधळ किंवा अनिश्चित वातावरण झाले नाही.

मीडिया नेहेमी प्रमाणे याला TRP साठी फुगवून सांगत असली तरी सुनीता आणि तिचा सहकारी यात्री दोघे आता स्पेस स्टेशन वर सुखरूप आहेत आणि त्यांच्या बरोबर तिथे आधीपासूनच असलेल्या नासाच्या 7 ऍस्ट्रोनॉट फ्लाईट इंजिनिअर यांचा सुद्धा समावेश आहे.

हे 7 जण आणि सुनीता व तिचा सहकारी असे एकूण 9 जण सध्या स्पेस स्टेशन वर आहेत.


स्पेस स्टेशन हे एक बंदिस्त हॉटेल प्रमाणे असते परंतु तिथे सर्व प्रकारच्या राहण्याच्या, जेवणाच्या, रसद सामुग्री ही मर्यादित प्रमाणातच असते.

सुनीता विलियम्स तिच्या यांतून त्या दोघांना 7 दिवस पुरेल इतकाच रसद साठा घेऊन गेली असल्याने तिथे काही काळ मर्यादित रसद वापरण्याची व्यवस्थापन करावे लागले परंतु आजच तिथे Space X तर्फे नवी रसद सामुग्री घेऊन एक रॉकेट सोडण्यात आले जे त्यांना जास्त रसद पुरवठा करून अजून वेळ लागला तरी त्यांची जेवण खाण्याची पाण्याची गैरसोय होणार नाही हे आता सुनिश्चित झाले आहे.

वर सांगितल्या प्रमाणे बोईंग स्पेस कंपनी यानाच्या बिघाड दुरस्ती वर पृथ्वीवरून काम करत आहे आणि त्या प्रमाणे यान परत येताना कोणते संभाव्य धोके होऊ शकतात त्यावर काय उपाय आहेत हे सर्व सिम्युलेशन आणि सॉफ्टवेअर अपडेट द्वारे पडताळणी टेस्टिंग केले जात आहे.

याच काळात रशियाचा एक सॅटेलाईट नष्ट केला गेल्याने त्याचे मोठे तुकडे अवकाशात ज्या मार्गात पसरले आहेत त्याच मार्गातून सुनीता विलियम्स चे स्टारलाइनर यान परत पृथ्वीच्या दिशेत येणार असल्याने तो सुद्धा दुसरा धोका आहे ज्यावर नासा लक्ष ठेऊन आहे.

सॅटेलाईट चे तुकडे कालांतराने एका कक्षेत स्थिर होतात नाहीतर पृथ्वीवर पडून जळून नष्ट होतात त्यामुळे जास्त वेळ लागला तर चांगलंच आहे त्यामुळे सॅटेलाईट चे तुकडे अवकाशात पसरलेल्या भागातून दूर दूर जात तिथे मोठी मोकळी जागा बनू शकते ज्यातून स्टारलाइनर यान परतीचा प्रवास करून पृथ्वीच्या वातावरणात शिरेल.

वातावरणात परत आल्यावर स्टारलाइनर यानाचे पॅराशूट च्या साहाय्याने जमीनवरच उतरण्याचे प्लॅन केले आहे.

आधी सांगितल्या प्रमाणे हे सर्व मिशन एक नव्या प्रकारच्या यानाची टेस्ट असल्याने नासा यात वेळ गेला तरी चालेल पण याच यानाने दोन्ही ऍस्ट्रोनॉट ला पृथ्वीवर आणायचे या धेय्याने काम करत आहे.


आता याची दुसरी non-technical problem बाजू बघू –

आधी सांगितल्या प्रमाणे दोन्ही ऍस्ट्रोनॉट अडकलेले नाहीत ते केवळ परतीच्या प्रवासाची वाट बघत आहेत.
पण त्यांना आधी परत येता आले असते का ?
तर होय , त्यांना मिशन संपल्यावर स्टारलाइनर यानात बिघाड झाला हे समजल्यावर स्पेस स्टेशनला जोडली गेलेली इतर याने जसे रशिया चे सोयूझ किंवा Space X चे crew dragon ही याने उपलब्ध आहेत.

मग ती वापरून हे दोघे परत का येत नाहीत ?

इथे प्रश्न उभा राहतो तो म्हणजे geo-politics चा आणि नासा व बोईंग च्या प्रतिष्ठेचा.

शीत युद्ध काळातील स्पेस रेस जशी रशिया आणि अमेरिका मध्ये होती तशी रेस आता अनेक देशात सुरु झाली आहे.

चीन, रशिया, जपान हे देश तर आहेतच पण अमेरिकेतच आता नासा आणि प्रायव्हेट कंपन्या जसे Space X, बोईंग, ब्लू ओरिजिन, वर्जिन गॅलॅक्टिक असे अनेक अंतर्गत रेस सुद्धा तयार व्हायला लागल्या आहेत.

भारताचे ISRO सुद्धा आता या रेस चा मोठा खेळाडू म्हणून बनले आहे.

या मिशन बाबतीत म्हणायचे तर Space X आणि बोईंग यांची ही थेट प्रतिष्ठेची लढाई आहे.

रशिया – युक्रेन युद्धात अमेरिका ही युक्रेन ला उघडपणे मदत देत असल्याचे समजल्यावर रशिया आणि अमेरिकेत तणाव वाढला आहे, त्यामुळे अमेरिकेने म्हणजे नासा ने आता या मिशन ला मदत व्हावी म्हणून रशिया कडे त्यांचे स्पेस स्टेशन वर असलेले सोयूझ यान वापरण्याचे विचारणे म्हणजे स्पेस रेस हरल्या सारखे आहे आणि त्यामुळे नासा ला सुद्धा या सर्वात त्यांची प्रतिष्ठा वाचवायची आहे.

आधी सांगितल्या प्रमाणे बोईंग पृथ्वीवर असलेल्या स्टारलाइनर मॉडेल वर काम करत आहे पण त्यांना Space X ने मदत दिली तरी ती घेणे म्हणजे सुद्धा त्यांच्या स्टारलाइनर यान फेल झाले असे मान्य केल्या सारखे होईल म्हणून ते सुद्धा वेळ गेला तरी चालेल पण आम्ही त्या दोन्ही ऍस्ट्रोनॉट ला स्टारलाइनर यानानेच पृथ्वीवर परत आणणार आणि मिशन सफल झाली यावर आनंद मानणार असे विचित्र उद्देश ठेऊन सध्या सर्व काम होत आहे.

या सर्वांच्या प्रतिष्ठा आणि जिओ पोलिटिकल ओढाताणीत दोन्ही ऍस्ट्रोनॉट चे स्पेस स्टेशन वर थांबून राहण्याचे दिवस मात्र रोज वाढत जात आहेत आणि ते नेमके कधी परत येणार यावर अजून अनिश्चितता कायम आहे. पण आता space X ने रसद सामग्री resupply मिशन केल्याने काळजी नाही.

फक्त स्टारलाइनर यान मधील खराबी 200% दूर झाली याची खात्री झाल्यावरच आता ते या यानातून परत येतील असे सध्या प्लॅन आहे नाहीच तर Space X चे मोड्युल वापरून या महिन्यात परत येतील हे नक्की.

त्यामुळे या बाबतीत मीडिया ने TRP हेडलाईन वर उलट सुलट बातम्या दिल्या तरी सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे आणि सुनीता विलियम्स व तिचा सहकारी ऍस्ट्रोनॉट इतर लोकांबरोबर स्पेस स्टेशन वरच सुखरूप आहेत हे समजून चला.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!