
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गुन्हा दाखल केला . जोगेश्वरी भूखंड आणि पंचतारांकित हॉटेल प्रकरणी गुन्हा दाखल झालाय.यामुळे आमदार रवींद्र वायकर अडचणीत वाढ झालीय.
रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. जोगेश्वरी येथील हॉटेल संदर्भात ही तक्रार होती. मुंबई महापालिकेच्या राखिव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधली आहे. त्याची परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. हा सुमारे 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे ही तक्रार करण्यात आली होती. त्याची गंभीर दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेनं वायकर यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. वायकर चौकशीला उपस्थित राहिले होते. त्यानंतर आता वायकरांच्या अडचणीत वाढ झाली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकरांवर कोविड बॅग घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ झाली होती. आता रविंद्र वायकरांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे गट पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. एका पाठोपाठ एक शिवसेना ठाकरे गटासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या ठाकरेंच्या शिलेदारांवर गुन्हे दाखल केले जात आहे. त्यामुळे येत्या काळात नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या अडचणींत वाढ होणार असल्याचं बोललं जात आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत