वादात सापडलेल्या आय.ए.एस (I.A.S.) आधिकारी पुजा खेडकर आखेर बडतर्फ
नवी दिल्ली : वादात सापडलेल्या महाराष्ट्र केडरच्या प्रशिक्षणार्थी आय.ए.एस.(I.A.S.) पूजा खेडकर हिची उमेदवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाने रद्द केली आहे.
याशिवाय, यु.पी.एस.सी.(U.P.S.C.) ने तिला काळ्या यादीत टाकले आहे,
याचा अर्थ ती भविष्यात कधीही यु.पी.एस.सी
(U.P.S.C.) परीक्षेला बसू शकणार नाही.
यु.पी.एस.सी.(U.P.S.C.)ने तिला नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी सिद्ध केले,
त्यानंतर तिच्यावर ही कारवाई करण्यात आली.
यु.पी.एस.सी.(U.P.S.C.) ने पूजा मनोरमा दिलीप खेडकरची उमेदवारी रद्द केली आहे आणि तिला भविष्यातील सर्व परीक्षा,निवड यापासून कायमचे काढून टाकले आहे.
उपलब्ध नोंदी तपासल्यानंतर,
यु.पी.एस.सी.
(U.P.S.C.) ला सी.एस.ई २०२२(C.S.E.)-
2022 नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल खेडकर दोषी आढळली.
यु.पी.एस.सी.
(U.P.S.C.) ने २००९ ते २०२३ या पंधरा हजारांहून अधिक शिफारस केलेल्या उमेदवारांच्या १५ वर्षांच्या सी.एस.ई.(C.S.E.) डेटाचे पुनरावलोकन केले,
त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
खेडकर हिला १८ जुलै २०२४ रोजी बनावट ओळखीचे भासवून परीक्षा नियमांमध्ये विहित वयोमर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस सी.एस.एन. (SCN) बजावण्यात आली होती.
त्याला २५ जुलै २०२४ पर्यंत एस.सी.एन.(S.C.N.)ला उत्तर द्यायचे होते.
तथापी, तिने ४ ऑगस्ट २०२४ पर्यंत वेळ मागितला जेणेकरून, ती तिच्या उत्तरासाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करू शकेल.
यु.पी.एस.सी.(U.P.S.C.) ने पूजा खेडकरच्या विनंतीचा काळजीपूर्वक विचार केला आणि न्याय मिळवून देण्यासाठी तिला कारणे दाखवा नोटीसला उत्तर देण्यासाठी ३० जुलै २०२४ रोजी दुपारी ३:३० पर्यंत वेळ देण्यात आला.
ही शेवटची संधी असून यापुढे मुदतवाढ दिली जाणार नाही,
असेही आयोगाने त्यांना स्पष्टपणे सांगितले होते.
वरील तारखेपर्यंत वेळेपर्यंत प्रतिसाद न मिळाल्यास यु.पी.एस.सी.
(U.P.S.C.) तिच्याकडून कोणताही संदर्भ न घेता पुढील कारवाई करेल,
असेही स्पष्ट शब्दात त्यांना सांगण्यात आले.
तिला मुदतवाढ देऊनही ती निर्धारित वेळेत स्पष्टीकरण देऊ शकली नाही, त्यानंतर आयोगाने तिच्यावर कारवाई केली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत