खान्देशमहाराष्ट्रमुख्यपान

तोंडात तंबाखू कोंबून ८ दिवसाची चिमुकलीची हत्त्या

जळगाव मध्ये एका निर्दयी बापाने तिसरी मुलगी झाली म्हणून तिची निर्घृण हत्या केली. अवघ्या आठ दिवसांच्या चिमुरडीच्या तोंडात बापाने तंबाखू कोंबून तिची हत्या केली. इतक्यावरच हा हैवान बाप थांबला नाही. त्या चिमुकलीच्या मृतदेहाची विल्हेवाट त्याने लावली. आशा कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही धक्कादायक घटना उघडकीस आली आणि आरोपी बापाला अटक करण्यात आली.

जळगाव जिल्ह्यातल्या जामनेरमधल्या हरिनगर तांजा इथं गोकुळ मोतीराम जाधव हा आपल्या कुटुंबासोबत राहातो. गोकुळ जाधवला याआधी दोन मुली आहेत. 2 सप्टेंबरला वाकोद प्राथमिक आरग्य केंद्रात त्याच्या पत्नीने तिसऱ्या मुलीला जन्म दिला. काही दिवसांनी पत्नी आणि नवजात बाळ घरी आलं. पण तिसरीही मुलगी झाल्याने गोकुळच्या मनात प्रचंड संताप होता. तिचं तोंडही तो बघत नव्हता. अखेर 10 सप्टेंबरला हैवान आरोपीने धक्कादायक पाऊल उचललं. गोकुळने अवघ्या 8 दिवसांच्या लेकीच्या तोंडात तंबाखू कोंबला आणि तिची हत्या केली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!