दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

नळदुर्ग शहरात विविध ठिकाणी नारी शक्तीचा सन्मान

अंतरराष्ट्रीय महिला सन्मान दिन मोठ्या उत्साहात साजरा .

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

नळदुर्ग या ऐतिहासिक शहरात नळदुर्ग आणि परिसरातील शासकीय निमशासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांचा व सर्व सामान्य महिलांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत पर सत्कार करण्यात आला यावेळी नळदुर्ग येथील डॉ आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष तथा मुख्य प्रवर्तक मारुती खारवे यांच्या मार्फत सर्व शिक्षकांचा शाल फेटे पुष्पहार पुष्पगुच्छ सावित्रीमाईचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला नळदुर्ग येथील शिवम कम्प्युटर सेंटर चे मुख्य प्रवर्तक तथा नळदुर्ग शहर व्यापरी महासंघाचे अध्यक्ष सतीश पुदाले यांनी सर्व विद्यार्थिनी व शिक्षकांचा पुस्तक एक पेन देऊन गौरव करण्यात आला नळदुर्ग येथे बस सेवेमध्ये कार्यरत असलेल्या मुमताज मोमीन या वाहकाचा सत्कार पत्रकार इरफान काझी पत्रकार संपादक दादासाहेब बनसोडे यानी केला जिल्हा परिषद कन्या प्रशालीतील सर्व शिक्षकांचा मुख्याध्यापक कमलाकर गायकवाड यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला सय्यद अब्दुल्ला उर्दू मेमोरियल हायस्कुल येथे सर्व महिला शिक्षकांचा सत्कार करण्यात आला जिल्हा उपजिल्हा रुग्णालय नळदुर्ग येथील सर्व परिचारिका यांचा सत्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे माजी शहराध्यक्ष दत्तात्रय बनसोडे कार्याध्यक्ष महादेव कांबळे आदिनी पुष्पगुच्छ सत्कार केला याचबरोबर शहरातील विविध ठिकाणी बस स्थानक डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक क्रांती चौकामध्ये राजमाता अहिल्याबाई होळकर चौकात महिलांच सत्कार करण्यात आला .

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!