संविधानाचा विजय.

महाराष्ट्र राज्य मनपा नपा संघटना फेडरेशनच्या पाठपुराला अखेर यश.
औरंगाबाद खंडपीठाने दिनांक 23 मार्च 2023 रोजी लाड पागे मध्ये नोकरीस लागणाऱ्या पाल्यास स्थगिती दिली होती महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिकेमध्ये जे कर्मचारी लाड पागे नोकरी पासून वंचित राहिले होते त्यात अनुषंगाने न्यायालयीन लढाई लढण्यासाठी महाराष्ट्र फेडरेशन संघटनेने दिनांक 10 ऑगस्टमध्ये 2023 मुंबई या ठिकाणी संघर्ष समितीचे नेते डी.एल कराड साहेब, सुरेश ठाकूर साहेब, बबनराव झिंजुर्डे साहेब, प्रवक्ते गौतम खरात साहेब, संतोष पवार, यांच्या प्रमुख उपस्थित बैठक घेऊन या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यास ठराव पास केला तेव्हापासून आज तागायत महाराष्ट्र कामगार नेते डी.एल.कराड एडवोकेट सुरेश ठाकूर, एडवोकेट सुनील वाळूजकर,फेडरेशनचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे प्रवक्ते गौतम खरात संघटनेचे कार्याध्यक्ष गणेशराव शिंगे संतोष पवार, अनिल जाधव, अशोक जाधव, बापूसाहेब सदाफुले या पदाधिकाऱ्यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये सततचा योग्य तो पाठपुरावा करून दिनांक 24. 6.2024 रोजी लाड पागे शिफारीनुसार एस.सी नव बौद्ध महार,मातंग या समाजातील वारसदारांना न्याय मिळवून दिला.
मा. न्यायमूर्तींनी अनुसूचित जाती मधील सर्व जातीच्या कामगाराना लाड व पागे कमिटीनुसार असलेल्या वारस नोकरीच्या लाभाबाबत असलेली स्थगिती उठवलेली आहे,मात्र उर्वरित खुला प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील कामगार यांना लागू असलेली स्थगिती कायम ठेवलेली आहे.
या निकालामुळे अंशतः न्याय मिळालेला आहे परंतु उर्वरित खुला प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील सफाई कामगार यांना अद्याप न्याय मिळालेला नाही.
महाराष्ट्र राज्य मनपा नपा फेडरेशन कामगार संघटना पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने पाठपुरावा केल्यामुळेच हे यश प्राप्त झाले आहे व असाच पाठपुरावा यापुढेही सुरू ठेवल्यास उर्वरित कामगारांनाही न्याय मिळू शकेल. त्यामुळे सर्वांनी एकजूट ठेवावी.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत