महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

बहुजन हिंदूंनी जागे होण्याची वेळ आहे.

प्रा. गंगाधर नाखले

जर छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू होते, त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तर मग त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे कोणत्या धर्माचे होते. त्यांचा धर्म शोधा. मुस्लिम, ख्रिश्चन आणि बौद्ध हे तर नक्कीच नव्हते.

छत्रपती संभाजी महाराज हे शूर होते पराक्रमी होते. चरित्रवान होते. हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी त्यांनी आपले बलिदान केले, तर मग त्यांना दूरव्यसनी, चरित्रभ्रष्ट आणि दुर्गुणी कोणी म्हटले.? मुस्लिमांनी ख्रिश्चनांनी आणि बौद्धांनी कधी त्यांना चरित्र भ्रष्ट म्हटले नाही. तुमच्या खात्रीसाठी पुरावा खाली दिलेला आहे.

“इतिहास का उदाहरण हमारे सामने है. छत्रपती शिवाजी के बाद उनका पुत्र राजा संभाजी बना. व्यसनोंशे ग्रस्त होकार व चरित्रभ्रष्ट हो गया. उसके व्यसन का लाभ उठाकर शत्रुओने उसे बंदी बना लिया. अंततो गतवा बडी क्रूर तासे उसका वध हुआ. संभाजी का तो बुरा हुआ ही, साथ ही संपूर्ण स्वराज्य पर भयंकर आपत्ती आई. बताते है की वह शिवाजी से भी अधिक पराक्रमी व तेजस्वी था किंतु दुर्गुणो के आगे सारा पराक्रम और तेजस्विता निरर्थक हो गई”

इतिहासात कोणताही पुरावा नसताना आमचा बहुजनांचा राजा छत्रपती संभाजी महाराज यांना चरित्र भ्रष्ट आणि दुर्गुणी म्हणण्याचे धाडस करणारा हा कोणत्या धर्माचा आहे, आधी ते शोधा.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा वापर करून हे लोक फक्त सत्ता प्राप्त करतात या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराज यांच्या सोबत काही घेणेदेणे नाही. हे तेच लोक आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना हे लोक शूद्र समजत होते. त्यांचा राज्याभिषेक करण्यासही कडाडून विरोध करत होते.

दुसऱ्या बाजूला जे खरे चरित्र भ्रष्ट लोक आहेत त्यांना मात्र हे भारतरत्न देतात या देशाचा पंतप्रधान करतात. बलराज मधोक भारतीय जनसंघ चे राष्ट्रीय महासचिव आणि जनसंघाच्या इतरही महत्त्वाच्या पदावर राहिलेले आहेत. अशा या बलराज मधोक महोदयांनी आपले लाडके पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयी हे चरित्रभ्रष्ट असल्याचा पुरावा दिल्यावर सुद्धा गोडवलकर गुरुजी मात्र त्यांना चरित्र भ्रष्ट म्हणत नाही. परंतु दुसऱ्या बाजूला छत्रपती संभाजी महाराज यांना मात्र ते चरित्रभ्रष्ट म्हणतात. आता बहुजन हिंदूंनी जागे होण्याची वेळ आहे.
प्रा. गंगाधर नाखले

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!