
बंदीनंतरही नागपुरात पीओपी गणेशमूर्ती विक्रीस आल्याच आढळून आलय..त्यामुळे पीओपी मूर्तीसंदर्भात महापालिकेने धडक कारवाई करत 117 मूर्ती जप्त केल्या 10 हजार रुपये दंड वसूल केलाय.यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा याकरिता नागपूर महानगरपालिका प्रयत्नरत आहे. पीओपी मूर्तींच्या विक्रीसंदर्भात नागपूर महानगरपालिकेद्वारे संपूर्ण शहरात धडक कारवाई सुरू करण्यात आली असून,बजेरिया चौक येथील शाहू मूर्ती भंडार यांच्यावर कारवाई करीत 117 पीओपो मूर्ती जप्त करण्यात आल्या व मूर्ती विक्रेत्यांकडून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत