दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

दिनविशेष – शुक्रवार दिनांक 24 मे 2024

आज दि. २४ मे २०२४, बुद्धाब्द २५६८, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३४, सुक्कवारो, वेसाख मासो, शुक्रवार, वैशाख माहे.

२४ मे १९३२ – रोजी दक्षिणेतील अस्पृश्य वर्गाने बेलगाम मधे विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सन्मान पत्र भेट दिले. आंबेडकर यांनी सादर केलेल्या सन्मान पत्राला उत्तर देताना म्हणाले की, “समाज सुधारण्यापूर्वी राजकीय सुधारणांना प्राधान्य दिले पाहिजे कारण राजकीय सुधारणांशिवाय आपल्या बहुजन वर्गाच्या पातळीत सुधारणा होण्याचा वाव नाही.

२४ मे १९४१ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईतील खार येथे “महार ज्ञाती पंचायत समिती” ची स्थापना केली.
२४ मे १९५० – रोजी हैद्राबाद येथे कायदेमंत्री विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण.

२४ मे १९५६ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नरे पार्क मुंबई येथे बुद्ध जयंतीच्या समारंभा प्रसंगी आपण ऑक्टोबर महिन्यात बौद्ध धंम्माची दीक्षा घेणार आहोत अशी घोषणा केली. तसेच भाषण करतांना सावरकरांवर टीका करून बौद्ध धंम्मावर चर्चा करण्याचे जाहीर आव्हान दिले. त्यांचे मुंबईतील हे शेवटचे भाषण होय.

२४ मे १९५६ – रोजी भारतीय बौद्धजन समितीकडे धंम्मांतर संबंधी लोकांची शेकडो पत्रे आले असता विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांच्या माहितीसाठी बौद्ध धंम्म व धंम्मांतर आशयाचे पत्र लिहिले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!