”शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच कोकणात”

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच कोकणात येणार आहेत तसेच ते इतर ठिकाणीही भेट देणार आहेत. ते 4.15 च्या दरम्यान राज्यात येतील व त्यानंतर ते “नौदल दिन 2023” कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. नौदलाची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी ते प्रथमच कोकणात येत आहेत. हे विशेष आहे. नंतर ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. असा त्यांचा आजचा दिनक्रम असणार आहे.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नौदलाचे अधिकारी, विदेशी पाहुणेदेखील उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करण्यात आले आहेत. स्वच्छता, सुशोभिकरणावर भर देण्यात आला असून चोख सुरक्षाही बजावण्यात आली आहे. मोदी सिंधुदूर्गात येणार असल्याने आठवडभराआधीच येथे कडक सुरक्षा तैनात होती. अनेक बाजारपेठे मर्यादित कालावधीपर्यंत बंद ठेवण्यात आले.
दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. सिंधुदूर्ग येथील ‘नौदल दिन २०२३’ हा सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समृद्ध सागरी वारशाला आदरांजली अर्पण करत आहे. पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आय. एन. एस. विक्रांतचे पंतप्रधानांनी जलावतरण केले तेव्हा शिवरायांच्या राजमुद्रेपासून प्रेरणा घेत साकारण्यात आलेल्या नौदलाच्या नव्या ध्वजाचा भारतीय नौदलाने स्वीकार केला.
दरवर्षी, नौदल दिनानिमित्त, भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांद्वारे ‘कार्यान्वयन प्रात्यक्षिके’ आयोजित करण्याची परंपरा आहे. ही ‘कार्यान्वयन प्रात्यक्षिके’ लोकांना भारतीय नौदलाने हाती घेतलेल्या बहु-क्षेत्रीय मोहिमांचे विविध पैलू पाहण्याची संधी देतात. हे राष्ट्रीय सुरक्षेप्रती नौदलाच्या योगदानावर प्रकाश टाकते, तसेच नागरिकांमध्ये सागरी जनजागृतीचा प्रसारही करते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत