दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

दिनविशेष – मंगळवार दिनांक 21 मे 2024

आज दि. २१ मे २०२४, बुद्धाब्द २५६७, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३४, कुंजवारो, वेसाख मासो, मंगळवार, वैशाख माहे.

२१ मे १९३२ – रोजी पुणे जिल्हा बहिष्कृत समाज व अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक संघ पुणे द्वारे विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानपत्र देण्यात आले.

२१ मे १९३२ – रोजी पुण्यातील अहिल्याश्रमात नामदार लठ्ठयांच्या अध्यक्षतेखाली विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानपत्र देण्यात आले.

२१ मे १९३८ – रोजी जावळी तालुका स्वतंत्र मजूर पक्ष परिषदेचे आमदार भाई चित्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दुसऱ्या अधिवेशनात विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले की, “आपल्या पक्षाचे सभासद व्हा, आपल्या पक्षाचे बळ वाढवा.”

२१ मे १९३८ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सहाशे मैल कोकण प्रांताचा दौरा करून ठिकठिकाणी आयोजित सभेत भाषणे करून मुंबईला परतले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!