मानवी हक्क, माध्यम स्वातंत्र्यावर जो बायडेन यांनी मोदींशी केली चर्चा.

जी २० शिखर परिषदेमध्ये युक्रेनसारख्या गुंतागुंतीच्या मुद्द्यावर सर्व सदस्यांमध्ये एकमत घडवून आणल्याची चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकमेकांशी सुहास्यवदनाने झालेल्या चर्चांचे फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. मात्र, जी २० परिषदेनंतर व्हिएतनाम दौऱ्यावर माध्यमांशी बोलताना जो बायडेन यांनी भारतातील मानवी हक्कांसंदर्भात, माध्यम स्वातंत्र्याविषयी चिंता व्यक्त केली आहे.
जी २० परिषदेच्या निमित्ताने आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींशी अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केल्याचं जो बायडेन म्हमाले यामध्ये भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध सुधारण्याबाबत चर्चा झाल्याचं त्यांनी नमूद केलं. मात्र, त्याचवेळी मानवी हक्कांचा आदर राखण्याचं महत्त्वही आपण अधोरेखित केल्याचं ते म्हणाले.
“मी हे नेहमीच करतो. या दौऱ्यात मी मोदींशी सविस्तर चर्चा केली. यात मानवी हक्कांचा आदर राखण्याचं महत्त्व मी त्यांच्याशी बोलताना अधोरेखित केलं. तसेच, नागरी समाज व मुक्त माध्यमे एक बलशाली देश निर्माण करण्यात किती महत्त्वाची भूमिका बजावतात यावरही मी त्यांच्याशी बोललो”, असं जो बायडेन यांनी व्हिएतनामच्या हनॉईमध्ये आपल्या संभाषणात नमूद केलं. “आम्हाला खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत”, असंही बायडेन यांनी यावेळी नमूद केलं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत