मुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर आज सर्व पक्षीय बैठक

मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सर्वपक्षीय बैठक,ठाकरे गटाकडून दानवे,विनायक राऊत उपस्थित राहणार. सर्व पक्षीय बैठकीत राजकारण नको असे जरांगे पाटलांनी आव्हान केले आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांची उत्सुकता आहे. मनोज जरांगे पाटील यांनी यांसदर्भात मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.
या बैठकीत सर्वपक्षीय नेते चर्चा करतील. त्यानंतर यातून काही मार्ग निघतो का, हे पाहावं लागेल. अजित पवार म्हणाले, मराठा समाजाला कुणबी समाजाला आरक्षण देण्यास काही ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीतून जरांगे पाटील यांच्या मागणीवर काही निर्णय घेता येतो का, त्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात बोलताना आंदोलन मनोज जरांगे पाटील म्हणाले, आमचं आंदोलन हे सरकारच्या विरोधात नाही. विरोधी पक्षांच्या विरोधात आमचे आंदोलन नाही. राजकारण्यांचे आंदोलन नाही. सर्वसामान्य मराठ्यांनी हे आंदोलन उभे केले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!