
कथित कौशल विकास घोटाळा प्रकरणात टीडीपी (TDP) प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना विजयवाडा एसीबी न्यायालयानं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
त्यांना अटक केल्यानंतर एका दिवसानंतर रविवारी सकाळी त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) न्यायालयात हजर करण्यात आले. कौशल्य विकास महामंडळ घोटाळ्याप्रकरणी विजयवाडा स्थानिक न्यायालयाने नायडू यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय दिला. निकालाच्या घोषणेच्या वेळी टीडीपीचे वरिष्ठ नेते आणि पक्षाचे कार्यकर्ते न्यायालयाच्या आवारात जमले होते. सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ लुथरा आणि वकिलांची टीम आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नायडू यांची बाजू लढत आहेत. दरम्यान, चंद्राबाबू नायडू यांना कोठडी दिल्याने आज आंध्र प्रदेश बंदची घोषणा करण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत