राजधानी दिल्लीत 2 रुग्णालयात बॉम्बस्फोट घडवून आणणार असल्याचा धमकीचा ईमेल – पोलीस प्रशासन सज्ज.

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तात्पुरता जामीन मिळाला असला तरी त्यांच्या मागची डोकेदुखी मात्र कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. कांहीं दिवसांपूर्वी दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती. यानंतर आज दिल्लीतील दोन प्रतिष्ठित रुग्णालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे.
यावेळीही धमकी देणाऱ्या व्यक्तीने जुन्या पद्धतीने ईमेल पाठवत ही धमकी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा धमकीचा मेल दिल्लीतील संजय गांधी रुग्णालय आणि बुरारी रुग्णालयला आला आहे. रुग्णालयांनी तात्काळ पोलिसांना यासंबंधी माहिती दिली व रुग्णालयांच्या तक्रारीनंतर पोलीस, अग्निशमन दल, सर्व नागरी यंत्रणांव्यतिरिक्त बॉम्ब आणि श्वान पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. रुग्णालयात शोधमोहीम सुरू आहे. मात्र आतापर्यंत रुग्णालय परिसरातून काहीही संशयास्पद आढळून आलेले नाही.
दरम्यान नागरिकांना सतर्क राहण्याचे तसेच कसलीही भीती न बाळगन्याचे आवाहन केले जात आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत