महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

नांदेड येथे उन्हाळी सुट्टीत श्रामनेर शिबिराचे आयोजन; भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तर चा स्तुत्य उपक्रम.

नांदेड : भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा नांदेड उत्तर,शहर शाखा नांदेड उत्तर आणि जिल्हा शाखा नांदेड उत्तरच्या संयुक्त विद्यमाने खास विद्यार्थी,कर्मचाऱ्यांसाठी तसेच सामान्य उपासकासाठी उन्हाळी सुट्टीत दहादिवशीय श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. शिबिराचे ठिकाण नालंदा बुद्ध विहार श्रद्धास्थळ भीमघाट या अत्यंत रमणीय ,शांत ,गोदावरीच्या शीतल नदी किनार्‍यावर असणार आहे.

या शिबिरात दरवर्षीप्रमाणे समाजातील शिक्षक, प्राध्यापक वकील असा बुद्धीजीवी, अभ्यासू, वैचारिक परिपक्वता असलेला वर्ग सहभागी होत असल्यामुळे या शिबिराचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. ज्यांच्या पर्यंत हा संदेश उशिराने पोचला आणि शिबिरात सहभागी होण्याची इच्छा आहे अशांनी आज दि.9/5/2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आपली नाव नोंदणी करून शकतात शिबीराचा कालावधी दि.9/5/2024ते 18/5/2024 असा आहे

गणपत गायकवाड, तालुका अध्यक्ष 9527881901 भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा नांदेड-उत्तर

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!