फुकटची साडी नको रे बापा !

जळगाव : मी आज जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील महिलांना विचारले.एकाच वेळेस पंधरा महिला होत्या.कोणत्या महिलेने मोदीकडे साडी ची मागणी केली होती?सर्वांनी एकमुखाने उत्तर दिले.आम्हाला नको अशी फुकटची साडी.आम्ही काय आकाशातून पडलो आहोत काय? आम्हाला आई, बाप,भाऊ, बहिण,पती,मुले,दीर,जेठ,काका,पुतणे,मामा ,फुहा आहेत.इतकी नाती असतांना आम्ही फुकटची साडी का घ्यावी?कोणा नवख्या माणसांकडून?इतके भिकारडे झालेलो नाहीत.
मोदी साहेबांनी आधी स्वताच्या धर्म पत्नीला साडी देऊन सन्मानाने सोबत न्यावे. आपला पती धर्म पाळावा.स्वताच्या पत्नीचा सन्मान सोडून आमचा त्रयस्थ महिलांचा सन्मान का करतात?त्यांना काय माहित कि,कोणत्या महिलेला फुकट साडीची गरज आहे?अशी गरज नसतांना, कोणी मागितली नसतांना महिलांना साडी देणे म्हणजे महिलांचा सन्मान कसा काय होतो?
आम्ही महिलांना सन्मान द्यायचा असेल तर आमची मुले,मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे.आमच्या मुलांना नोकरी उपलब्ध करून दिली पाहिजे. शालेय फी झिरो केली पाहिजे.जेणेकरून आमची मुले सहज शिकतील.नोकरी दिली तर तो फुकटचे राशन सुद्धा घेणार नाही.साडी घेण्याचा प्रश्नच येत नाही.
मोदी साहेबांनी फुकटची साडी आम्हाला देऊ नये.जी कोणी महिला लावारीश असेल तिला दोन पैसे कमवण्याची संधी दिली पाहिजे.तिला गरज असेल,तिने मागितली तर साडी दिली पाहिजे.अशा महिलेला तहसीलदार, कलेक्टर च्या माध्यमातून घरकुल दिले पाहिजे.पण असे होतांना दिसत नाही.अशा अनेक महिला आणि पुरुष आहेत ते घरकुल साठी दर दर भटकत आहेत.त्यांना का देत नाहीत घरकुल?तेथे तुमचे सरपंच आणि ग्रामसेवक आडवे येतात.
मोदी साहेब, आम्हाला अशी फुकटची साडी नको.त्या ऐवजी बेघर महिलांना घरकुल देण्याचा सक्त आदेश काढा.जो कोणी सरपंच किंवा ग्रामसेवक आणाकानी करीत असेल तर त्याला शिक्षा द्या.बेघर आहेत.जमीन आहे.पैसा आहे.तर काय हरकत आहे,बेघरांना घरकुल द्यायला? पण तुमचे सरपंच आणि ग्रामसेवक लांच मिळवण्यासाठी महिलांना उडवाउडवीची उत्तरे देतात.आमचे घरचे कोणी रागात बोलले तर फौजदारीची धमकी देतात.तेथे तुमचे आमदार खासदार मंत्री लक्ष देत नाहीत.खरी गरज येथे आहे.
… शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत