निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानविदर्भ

समाजवादी गणराज्य पार्टीचा अकोल्यात बाळासाहेब आंबेडकर यांना पाठिंबा !

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर अकोला लोकसभेची निवडणूक लढत आहेत. आज समाजवादी गणराज्य पार्टीचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील यांनी आज यशवंत भवन, अकोला येथे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन समाजवादी जनता परिवाराच्यावतीने त्यांना समर्थन आणि सक्रीय पाठिंबा जाहीर केला.

यावेळी कपिल पाटील यांच्यासोबत समाजवादी गणराज्य पार्टीचे महासचिव अतुल देशमुख, प्रदेशाध्यक्ष अजित शिंदे, अकोला जिल्हाध्यक्ष जिब्राईल दिवाण, माजी महापौर रऊफ पैलवान, औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष प्रकाश दाणे, अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष भीमरावजी कोरटकर, अमरावती जिल्हा संपर्क सचिव योगेश निंभोरकर, पार्टीचे सचिव सचिन बनसोडे, विनय खेडेकर आणि अकोला परिसरातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!