निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

बीड मध्ये पंकजा मुंडे आणि जरांगे पाटलात जुंपली. मराठा-ओबीसी मुद्यावरून शेरेबाजी

बीड : लोकसभा 2024 च्या आखाड्यात बीड मतदार संघातून प्रदीर्घ प्रतिक्षे नंतर पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली आहे. मिळालेल्या संधीच सोन करण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रचार दौरे आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटी गाठी चालू आहेत. एका सभेत “उपोषण करुन आरक्षण मिळणार नाही” असं विधान पंकजांनी केलं.. त्यावरुन पंकजांचा रोख कुणाकडे याची चर्चा सुरु झाली.

मराठा विरुद्ध ओबीसी मुद्द्यावर होणारी निवडणूक हा बीड लोकसभेचा इतिहास आहे. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा होणार अशी चिन्हं आहेत. निमित्त ठरलंय पंकजा मुंडे-मनोज जरांगेंची एकमेकांवर शेरेबाजी पाहता ही गोष्ट स्पष्ट होत आहे.

पंकजांच्या या विधानानंतर जरांगे-पाटील चांगलेच संतापले. पंकजांनी कुणाचं नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख आपल्याकडेच असल्याचं समजून जरांगेंनीही ” माझ्या वाटेला जाऊ नका” असा पंकजांना थेट इशारा दिला.

जरांगेंच्या संतापानंतर पंकजांनी स्पष्टीकरण देत आपण जरांगे पाटलांवर टीकाच केली नसल्याचं पंकजांनी म्हटलं. मनोज जरांगे पाटलांवर आपण टीका केलीच नसल्याचं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले. कुणीतरी आगाऊपणा केल्याचं त्या म्हणाल्या…वंचितांसाठी लढणा-यावर टीका आपण करूच शकत नाही…गेलं वर्षभर जरांगेंवर बोलले नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. कायद्यानं आरक्षण मिळणार उपोषण करून आरक्षण मिळत नसतं असं विधान पंकजा मुंडेंनी एका सभेत केलं होतं. त्याला जरांगेंनीही उत्तर दिलं होते.

पंकजा मुंडे आणि मनोज जरांगेंच्या विधानामुळे बीडच्या निवडणुकीत पुन्हा एकदा मराठा-ओबीसी फॅक्टरची एंट्री झाल्याचं बोललं जातंय. पंकजा मुंडेंचं विधान मराठा आरक्षणाशी संबंधित असल्यानं पहिल्यांदाच उघडउघडपणे मराठा-ओबीसी फॅक्टरची एंट्री झाल्याची चर्चा आहे. मराठा आरक्षण, मराठा आणि ओबीसी समाज यांच्या दृष्टीनं बीड का महत्त्वाचा राहिलाय.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!