महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

डॉक्टरांची धाव मुंबई, पुण्याकडे, ग्रामीण-निमशहरीमधील नागरिकांचे हाल.

ग्रामीण आणि निमशहरी भागातील सार्वजनिक वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया विभाग यासह बालरोग विभागामध्ये काम करण्यासाठी विशेष तज्ज्ञांचा सातत्याने तुटवडा असल्याचे दिसून येते. याचे प्रमुख कारण म्हणजे वरिष्ठ निवासी डॉक्टर हे आजही ग्रामीण भागापेक्षा मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये काम करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे नांदेड, नंदुरबार, गोंदिया, बीड, छत्रपती संभाजीनगर येथे बाँड केलेल्या वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या रिक्त पदांची संख्या अधिक आहे.

वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षेनंतर एक वर्षाची बंधपत्रित सेवा देणे बंधनकारक आहे. या सेवेची पूर्तता न केल्यास ५० लाख रुपये इतकी दंडात्मक रक्कम आकारली जाते. ही रक्कम मोठी असल्याने; तसेच पुढील सुपरस्पेशालिटी प्रशिक्षण घेण्याची तयारी करणारे वरिष्ठ निवासी डॉक्टर जागांची निवड करताना शहरांना प्राधान्य देताना दिसतात. नांदेड येथे नुकत्याच झालेल्या रुग्णमृत्यूच्या गंभीर प्रकरणानंतर येथील रिक्त पदे आणि मनुष्यबळ; तसेच औषधांच्या तुटवड्याचा गंभीर प्रश्न समोर आला. वैद्यकीय शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नांदेड येथे ९६ बंधपत्र सेवेच्या जागा ऑगस्ट महिन्यात रिक्त असल्याचे दिसते. त्यानंतर ४६ जागा भरल्या असून ५० जागा अद्यापही रिक्त आहेत. मुंबई, पुणे येथील वैद्यकीय महाविद्यालयांमधील रिक्त जागांना तत्काळ प्राधान्य दिले जाते. राज्यात कुपोषण, मातामृत्यू, विविध प्रकारच्या आजारांचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या व रुग्णसंख्येचा भार सातत्याने वाढता असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील जागा मात्र मोठ्या संख्येने रिक्त राहतात. नांदेडमधील शासकीय रुग्णालयामध्ये झालेल्या रुग्णमृत्यू प्रकरणानंतर या प्रक्रियेतील जागानियोजनाचा गांभीर्याने विचार होण्याची गरज व्यक्त होत आहे.वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागातील (डीएमईआर) वरिष्ठ प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करोना संसर्गाच्या काळात श्वसनविकार, औषधे आणि अतिदक्षता विभागाच्या जागा वगळता इतर विषयांच्या जागा वाया गेल्या आहेत. मुंबईत पालिका तसेच इतर सार्वजनिक रुग्णालयांमध्ये असलेल्या रिक्त पदांची संख्या मोठी असल्यामुळे येथील जागा ताबडतोब भरल्या जातात. त्यामुळे ‘डीएमईआर’ने योग्य पद्धतीने नियोजन केले तर वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या जागा ग्रामीण भागांतही तितक्याच तप्तरतेने भरल्या जाऊ शकतील, याकडे सार्वजनिक आरोग्यअभ्यासक विनोद शेंडे यांनी लक्ष वेधले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!