दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामान्य ज्ञान

दिनविशेष १९ एप्रिल २०२४

आज दि. १९ एप्रिल २०२४, बुद्धाब्द २५६७, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३४, सुक्कवारो, चेत मासो, शुक्रवार, चैत्र माहे.

१९ एप्रिल १९३१ – रोजी मुंबई येथे अखिल भारतीय अस्पृश्य परिषद संपन्न झाली.

१९ एप्रिल १९३१ – रोजी पिरकल येथील गोरहेल फ्युएल सोसायटीच्या सभागृहात विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई येथे लीडर्स कॉन्फरन्स आयोजित केली. बंगाल, सिपी, मद्रास (चेन्नई) आणि महाराष्ट्रातील सर्व प्रमुख निराश वर्ग नेते आणि एन. शिवराज अध्यक्ष होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत केलेल्या टीमचा अहवाल सादर केला. या अहवालाचे वेगवान टाळ्यांच्या कडकडाटात संम्मेलणाला अनंन्य पद्धतीने पाठिंबा दर्शविला गेला.

१९ एप्रिल १९३९ – रोजी राजकोट संस्थानातील राजकीय सुधारणांचा नेमलेल्या मंडळावर, अस्पृश्य वर्गाचा प्रतिनिधी सुधारणा समितीवर घ्यावा त्यासाठी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधीशी चर्चा केली.

१९ एप्रिल १९४२ – रोजी रोहिदास तरुण सुधारक संघाच्या महिला शाखेचे कल्याण जिल्हा ठाणे येथे विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. “इतरांच्या मदतीवर जगू नका, स्वावलंबी व्हा.” असा त्यांनी तरुणांना उपदेश केला.

१९ एप्रिल १९४५ – रोजी शिमला येथे भरलेल्या ‘नॅशनल सर्विस ट्रिब्यूनल’ परिषदेत ‘टेक्निकल ट्रेनिंग, नॅशनल सर्विस ऑर्डीनंस आणि रोजगार योजना’ यावर विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विचार मांडले.

१९ एप्रिल १९५१ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी “लोकसभेच्या (दुरुस्ती) विधेयकावर Representation of People (Amendment) Bill” संसदीय वादविवादात पुन्हा चर्चा सुरू केली.

१९ एप्रिल १९५३ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र यशवंतराव यांचा मीराबाई यांच्याशी परळच्या आर एम भट हायस्कूलमध्ये बौद्ध पद्धतीने विवाह झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबईत असूनही विवाहाला हजर राहिले नाहीत. मात्र डॉ. माईसाहेब आंबेडकर उपस्थित होत्या.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!