महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

महान चक्रवर्ती राजा सम्राट अशोक..!

जेव्हा यूरोप झोपड्यात राहत होता, तेव्हा सम्राट अशोक दगडात तीन मजली लेण्या कोरत होता..!

जेव्हा पाश्चिमात्त्य देश प्लेगच औषध म्हणून काळे मिरे खात होते, तेव्हा सम्राट अशोक भारतात पशुं साठी दवाखाने काढत होता..!

जेव्हा जगात शिकारी साठी नवे नवे प्रदेश शोधले जात होते तेव्हा सम्राट अशोक भारतातपशू हत्या बंद करत होता..!

आज ऑक्सफोर्ड, हावर्ड सारख्या जगतप्रसिद्ध यूनिवर्सिटी असतील युरोप अमेरिकेत.. पण जेव्हा विद्यापीठ काय असतं हे जगाला माहित नव्हतं तेव्हा सम्राट अशोक भारतात शेकडो
विद्यापीठं चौर्याँशी हजार (84,000/-) बांधत होता..!

जेव्हा धर्म प्रचार हा प्रकारच जगात नव्हता तेव्हा सम्राट अशोक विविध माध्यमातून
जगाला बौद्ध धम्म सांगत होता..!

कलिंगचे युद्ध व त्यानंतर झालेला रक्तपात पाहुन बुद्धाला शरण जावेसे वाटणं आणि युद्ध नको बुद्ध हवा ही विचारधारा अंगिकारणं एका सम्राटाला कदापी शक्य झालं नसतं, बौद्ध धर्माचा खरा प्रचार, प्रसार आणि विशेष म्हणजे “अंगिकार” करणारा महान राजा.

अखंड भारतवर्षची संकल्पना काय असते हे बघायच असेल तर महान सम्राट अशोकाच राज्य बघा. नुसतं अखंड भारतवर्ष नव्हे तर ऐश्वर्यसंपन्न, शांततामय सुखी राज्य,याची साक्ष अशोकाचे शिलालेख देतात.

विश्व सम्राट अशोक यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन…

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!