निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्य पानमुख्यपानराजकीय

मोदी ची हवा आहे या भ्रमात राहू नका – भाजपा उमेदवार नवनीत राणा

अडसुळांनी झापताच राणा दाम्पत्य लागलीच भेटीसाठी दारावर दाखल.

अमरावती : भाजपा ने अमरावती लोकसभा मतदारसंघातून अनेक निष्ठावान नेत्यांना डावलून, प्रहार सारख्या मित्र पक्षाचा विरोध पत्करून ज्यांना उमेदवारी दिली त्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांनी जाहीर सभेत बोलताना “मोदींची हवा आहे, या भ्रमात राहू नका. अशी कांहीं लाट वगेरे नसते. मी 2019 ला मोदी लाट असतानाही आणि भाजपा कडे सर्व यंत्रणा असतानाही अपक्ष निवडून आले होते. त्यामुळे मोदींची लाट आहे या भ्रमात राहू नका” असे थोडेसे आत्मप्रौढी मिरवणारे वक्तव्य केले होते. यावर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

नवनीत राणा यांनीच मोदींची हवा काढली असल्याची टीका विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी केली. त्यानंतर नवनीत राणा यांनी स्पष्टीकरण देखील दिले.

लोकसभेची निवडणूक आपल्याला ग्रामपंचायत सारखी लढवावी लागेल. आपले जेवढे मतदार आहेत ते सर्व बूथ पर्यंत नेले पाहिजे. जर कोणी फुग्यात राहत असेल की मोदींची हवा आहे. तर लक्षात ठेवा 2019 मध्ये मी अपक्ष म्हणून निवडून आले होते. एवढी मोठी यंत्रणा असूनही एका पक्ष उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी भ्रमात राहू नये, असे वक्तव्य नवनीत राणा यांनी केले होते.

दरम्यान या सर्व प्रकारामुळे महायुतीतील नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी बुलढाण्यात बोलताना अतिशय तिखट शब्दात नवनीत राणा यांचा चांगलाच समाचार घेतला. अडसूळ म्हणाले, राणा यांच्यात अडाणीपणा आहे. त्यांना 17 रुपयांच्या साड्या वाटून त्यांची हवा निर्माण झालीय असे वाटते. मी त्या नवरा – बायकोला बंटी बबली हे नाव विचारपूर्वक दिले आहे. त्यांना खरंच अक्कल नाही. नैतिकता नाही. मंडळींनी मला आटापिटा करून थांबविले आणि त्यांना उमेदवारी दिली. गेल्यावेळी नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत होत्या. त्यांनी तिथेच थांबायचे होते, असे म्हणत स्पष्ट मत व्यक्त केले. राजकारण सोडेन, पण नवनीत राणा यांच्या प्रचाराला जाणार नसल्याचेही ते म्हणाले. कागदपत्रांवरून त्यांचे जातप्रमाणात बोगस असल्याचे दिसून येते, असा आरोपही त्यांनी केला.

या सर्व प्रकारावर प्रहार चे बच्चु कडू काय प्रतिक्रिया देतात ते पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!