महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

फाल्गुन पौर्णिमा आणि धम्म जाणून घेण्यासाठी बुध्दसृष्टी ला भेट द्या – पूज्य भंते आर्या मेत्ताजी.

कळंब : दि 25- 3-2024 रोजी फाल्गुनी पौर्णिमा आहे. दर पौर्णिमे प्रमाणे ही पौर्णिमा ही बुद्धसृष्टी धम्म स्थळी साजरी करण्यात येत आहे. तेव्हा या परिसरातील तमामजनास व बोद्ध उपासक उपासिकाना विनंती करण्यात येत आहे की आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने बुद्धसृष्टी धम्म स्थळी उपस्थित राहावे.

साधारणतः दि.24, 25 रोजी कार्यालायास सुट्टी असतात, कारण होळी हा हिंदू संस्कृतीचा सण उत्सव आहे. त्या संस्कृतीला मानणारे पहिल्या दिवशी आपल्या दारात व चौका चौकात गोवऱ्या लाकडे पेटउन गोड-धोडाचा निवद दाखउन चीते सारख्या दिसणाऱ्या त्या पेटलेल्या अग्नीला पाच फेऱ्या मारत मारत अक्षलील शिव्या देत असतात. परंपरेचा भाग म्हणून जोरजोरात बोंबलण्याची प्रथा तोंड सुजेपर्यंत पार पाडतात.

दुसऱ्या दिवशी कोणी तोंडा ला काळ फासूनं, आंगाला राख लावून, रंगं लावून, मादक पेय पिऊन मटण खाऊन अश्लील गाण्यावर नाच करत होळी साजरी करतात.

ती त्यांची संस्कृती आहे, कशी का असेना त्याचे लोक तिला पुढे घेऊन जातात. मग त्यांना ना कोणी तत्ववेता विद्वान लोक अडवतात, ना सरकार या संस्कृतीला वाईट म्हणून कांहीं बंधन घालतात.

बोद्ध संस्कृती प्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी उपोसत करावे, स्वतःचा व इतरांच्या कल्याणासाठी सम्यक विचार करावा. काय वाचा मनाने कोणतेही वाईट कर्म करणार नाही याचे स्मरन ध्यान साधनेतून करून, आपले मन प्रसन्न करावे. आणि प्रसन्न मनामुळे स्वतः साठी व इतरांसाठी सुखाची निर्मिती करता येते. तेव्हा या दोन दिवसाच्या सुटीचा फायदा घेऊन ही पौर्णिमा साजरी करून आपणही आपली संस्कृती बळकट करुया.

फाल्गुनी व इतरही पौर्णिमांचे निसर्गातील महत्व,तथागत भगवन बुध्दाच्या जीवनात घडलेल्ल्या घटनांचे महत्व, बोद्ध कसे बनावे बुद्ध धम्माची संस्कृती. इत्यादी बाबीवर, आर्या मेताजीची धम्म देसना होईल. इतर उपासक उपासिकानां धम्म मार्गदर्शन व धम्मा बाबतचे स्वानुभवावर बोलण्याची संधी दिली जाईल.

सर्वांच्या प्रति मंगल कल्याणा साठी आमची बोद्ध संस्कृती पुढे घेऊन जाणे आम्हा सर्वांची जबाबदारी आहे.

सर्वांना साधुवाद..

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!