निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी; सातारा आणि रावेर मतदार संघाचे उमेदवार जाहीर

मुंबई : लोकसभा 2024 साठी निवडणुकीच्या रिंगणात भाजपा ला सत्तेपासून खाली खेचण्याचा चंग बांधलेल्या महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी लोकसभा उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. एक्स सोशल मीडिया अकाऊण्टवरुन दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे, तर रावेरमधून श्रीराम पाटील यांना तिकीट जाहीर करण्यात आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्ष महाराष्ट्रात लोकसभेच्या दहा जागा लढवणार आहे. आतापर्यंत सात उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. त्यात आता सातारा आणि रावेर या दोन जागांची भर पडली आहे. त्यामुळे केवळ माढा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार घोषित करणे बाकी आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!