महाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिक

वैद्यकीय शिक्षणात अग्रेसर असलेल्या एमबीबीएस‌’ला प्रवेश मिळवून देतो असे सांगत २७‌ लाखांची फसवणूक.

वैद्यकीय शिक्षणात अग्रेसर असलेल्या एमबीबीएस शाखेला प्रवेश मिळवून देतो. असे सांगून २७‌ लाख २६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा‌ गुन्हा वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात‌ दाखल केला आहे.
महेंद्र देशमुख, (वय- ५९, रा- वारजे) यांनी फिर्याद दिली आहे. देशमुख यांना जयेश शिंदे, पवन सुर्यवंशी, (रा. चिखली, पुणे मुळगाव रा. हंगरगा, ता.निलंगा, जि. लातुर) व‌ राहुल तुपेरे या तिघांनी एमबीबीएस शाखेला प्रवेश मिळवून देतो‌. असे सांगून एप्रिल २०२३ पासून ‌२७ लाख २६ हजार रुपये घेतले. परंतु अद्याप प्रवेश मिळाला नाही. फिर्यादीस लुबाडून फसवण्याचे उद्देशाने पैशांचा अपहार केला म्हणून गुन्हा दाखल केला आहे. फौजदार जवळगी अधिक तपास करीत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!