EVM मशिन हद्दपार करण्याचा उपाय !

EVM मशिन बद्दल सगळ्यांच्याच मनात साशंकता आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयही याविषयी ऐकून घ्यायला तय्यार नाही. EVM एवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायच्या असतील, तर एक उपाय असून सर्व विरोधी राजकीय पक्षांना evm मशिन हद्दपार करणे सोपे आहे. ते कसे आपण पाहू या.
आपण एका अनामत रक्कम 10,000/ रुपयांवर चार लोकसभा *”राखीव”* जागेवर उमेदवारी भरू शकतो. म्हणजे समजा आपण रामटेक या राखीव जागेवर 384 उमेदवार उभे केले तर तेच उमेदवार त्याच अनामत रक्कमेवर अमरावती राखीव व आणखी दोन राखीव लोकसभा जागेवर कोणतीही अनामत रक्कम न भरता केवळ अर्जाच्या लागणाऱ्या खर्चावरच ऑनलाईन सुद्धा उमेदवारी भरता येते. तसेच जर समजा नागपूर येथील 384 उमेदवारांनी अर्ज भरले व त्या सर्वांनी वाराणसीला कोणतेही अतिरिक्त अनामत रक्कम न भरता वाराणसी लोकसभेकरिता उमेदवारी साठी अर्ज केल्यास त्याची उमेदवारी वाराणसीत सुद्धा निश्चित होईल. कारण नागपूरच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी पात्र केलेल्या पहिल्या फेरीतील उमेदवारास वाराणसी येथील निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अपात्र ठरवूच शकत नाही. याप्रकारे कोणतीही अतिरिक्त अनामत रक्कम न भरता एक जागी असलेला उमेदवार त्याच प्रवर्गासाठी भारतात अन्य 3 लोकसभेसाठी केवळ अर्जासाठी लागणारा खर्च करून चार लोकसभेसाठी उमेदवार होतो. याचाच दुसरा अर्थ महाराष्ट्रात 12 लोकसभा मतदारसंघात 384 उमेदवार उभे असल्यास त्यांचे अर्ज इतर 36 लोकसभेसाठी कोणतेही अनामत रक्कम न भरता केवळ
12 x 384 x 25000 = 11,52,00,000/- अक्षरी अकरा कोटी बावन्न लाख रुपयात संपूर्ण महाराष्ट्रात EVM हद्दपार होऊन जाईल. प्रत्यक्षात यापेक्षाही कमी रक्कम लागते कारण “राखीव लोकसभेसाठी” अनामत रक्कम कमी केल्यास रक्कम आणखी कमी होते.
तसेच संपूर्ण भारतातून EVM हद्दपार करायची असल्यास 543 मतदातसंघापैकी 136 मतदार संघ x प्रत्येकी 384 उमेदवार x प्रत्येकी 25000/- अनामत रक्कम =1,305,600,000/- अक्षरी एकशे तीस कोटी छप्पन लाख रुपये व 52 हजार 224 उमेदवार लागतात. EVM भारतातून हद्दपार करण्यासाठी प्रत्यक्षात राखीव 131 जगासाठी अनामत रक्कम कमी लागते त्यानुसार 131 जागेच्या 1/4 म्हणजेच
33 जागा x 384 उमेदवार x 10000/- रु म्हणजेच = 12,67,20000/- अक्षरी बारा कोटी सदुसष्ट लाख 20 हजार रुपये कमी केल्यास 117,88,80000/-अक्षरी एकशे सतरा कोटी, अठ्ठ्यांशी लाख, ऐंशी हजार रुपये खर्चात संपूर्ण भारतातून EVM नाईलाजाने हद्दपार करावी लागेल!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत