आंबेडकरी चळवळीच्या आणि समाजाच्या संरक्षणार्थ, एक परिवार एक सैनिक ! – मेजर ॲड. अनिल कांबळे.

धाराशिव येथे समता सैनिक दलाचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर संपन्न.


धाराशिव : शुक्रवार दि 29 मार्च 2024 रोजी स्मृति बुद्धविहार भीमनगर क्रांतीचौक धाराशिव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभा या धम्मसंस्थे अंतर्गत समता सैनिक दलाच्या एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ठीक 10.30 ते सायंकाळी 05 वाजे पर्यंत पूर्णवेळ पार पडलेल्या या शिबिरास मेजर ॲड. अनिल कांबळे सर, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जि.अध्यक्ष विजयमाला धावारे, जिल्हा कोषाध्यक्ष राजश्रीताई कदम, जिल्हा महिला विभागाचे उपाध्यक्ष शीलाताई चंदनशिवे, समता सैनिक दलाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल सरतापे, जिल्हा पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष विश्वास पांडागळे यांची प्रमुख उपस्थितीत होती.
सकाळी ठीक 10.30 वाजता स्मृती बुद्धविहार भीमनगर येथे मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमाचे पूजन करून शिबिरास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सभागृहापुढे समता सैनिक दलाच्या प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रशिक्षक म्हणून कांबळे सरांनी उपस्थित जवळपास 40 विद्यार्थ्यांना दुपारच्या सत्रा पर्यंत कवायत व इतर लाठी-काठी शिकविण्याचे प्रशिक्षण दिले त्याच बरोबर दुपारी लंच ब्रेकनंतर स्मृति बुद्धविहार या ठिकाणी 40 विद्यार्थ्यांच्या तोंडी व लेखी परीक्षेला सुरुवात करण्यात आली.
दुपारच्या सत्रात उपस्थित विद्यार्थ्यांची मनोगते आणि शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम सुरू झाला. या प्रसंगी कोषाध्यक्ष राजश्रीताई कदम, जिल्हा महिला विभागाचे उपाध्यक्ष शीलाताई चंदनशिवे, समता सैनिक दलाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल सरतापे, जिल्हा पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष विश्वास भाऊ पांडागळे, ता.संरक्षण सचिव सचिन दिलपाक यांनी ही मार्गदर्शन केले आणि शिबिरार्थींना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिबिरार्थींना मार्गदर्शन करत असताना दिवस भराच्या प्रॅक्टिकल आणि थेअरीचा अभ्यासक्रम पूर्ण करून शेवटी कांबळे सरांनी उपस्थित सर्व तरुणांना समता सैनिक दला मध्ये तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय समारोप करताना जिल्हाध्यक्षा विजयमाला धावारे म्हणाल्या की, “डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नाला गतिमान करण्यासाठी समता सैनिक दलाच्या जवानांनी प्राणांतिक प्रयत्न करावे !”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे जि.संघटक विजय बनसोडे यांनी केले तर आभारप्रदर्शन तालुका संरक्षण विभागाचे सचिव सचिन दिलपाक यांनी केले.
यावेळी भारतीय बौध्द महासभा ता.अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, ता.संरक्षण सचिव सचिन दिलपाक, ता.उपाध्यक्ष स्वराज जानराव, प्रतीक चंदनशिवे, ता.संघटक बापू जावळे, सुनिल माळाळे यांच्या सह मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होत्या.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत