भारतमहाराष्ट्रमुख्यपानसंपादकीय

राज्यात विविध ठिकाणी रस्ता सुरक्षा अभियानाला प्रारंभ

बीड जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पोलीस विभागानं राज्य रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम आयोजित केला होता. राज्यातही काल विविध ठिकाणी रस्ता सुरक्षा अभियानाला प्रारंभ झाला. वाहतूकीचे नियम हे आपल्या सर्वांसाठी असतात ते आपण सर्वांनी पाळावेत असं आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी या कार्यक्रमात केलं. अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियानाचं उद्‌घाटन करताना ते बोलत होते.वाहतूक नियम जागृतीसाठी काल शालेय विद्यार्थ्यांची फेरी काढण्यात आली. लातूर परिवहन कार्यालयानं यानिमित्त रस्ता सुरक्षा विषयक साहित्याचं वितरण करण्यास सुरुवात केली.वाढत्या अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी नांदेड जिल्हयात यावर्षी हेल्मेटयुक्त आणि अपघातमुक्त गाव अभियान राबवण्यात येणार आहे. यावर्षी संपूर्ण नांदेड जिल्हा अपघातमुक्त करण्याचा संकल्प करु या, असं आवाहनही अबिनाश कुमार यांनी केलं.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!