मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

डॉ बाबासाहेब आंबेडकरानी केलेला महाडाचा सत्यागृह म्हणजे पाण्यासाठी केलेला मानवमुक्तीचा महासंग्राम होय : अरुण लोखंडे


नंदगाव (शाम नागिले ) सामाजिक विषमता नष्ट होऊन सामाजिक समता निर्माण व्हावी यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरानी महाडच्या चवदार तळयाचा सत्यागृह केला. हा सत्याग्रह म्हणजे समतेसाठी निशस्त्र क्रांतीचे फुंकलेले रणशिंग असून मानवी हक्कासाठी केलेला सत्याग्रह म्हणजे महाडचा मुक्ती संग्राम होय . असे प्रतिपादन रिपाइं (आठवले) युवा आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष अरुण लोखंडे यांनी येथे बोलताना केले .
जळकोट ता. तुळजापूर येथे दि.२० मार्च २०२४ रोजी महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रह वर्धापण दिना निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी अरूण लोखंडे बोलत होते.
या बाबत सविस्तर व्रत असे की प्रथमता विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पुजन दिप धूप लावून व पुष्पहार घालून अरुण लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर सामुहीक त्रिशरण पंचशील घेण्यात आले
पुढे बोलताना अरुण लोखंडे म्हणाले की या देशात कुत्र्या मांजराला आणि जनावराना पाणवठ्यावर पाणी पिण्यास मुभा होती पण मात्र मानवाला पाणी पिण्याचा आधिकार त्यावेळच्या व्यवस्थेने नाकाराला होता . म्हणून डॉ बाबासाहेब चाळआंबेडकरांनी मनुवाद्याला . ठणकावून सांगितले की या पृथ्वीतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक मानव जातील पाणी पिण्याचा अधिकार आहे आणि तो मी घेतल्याशिवाय राहाणार नाही म्हणुन २० मार्च १९२७ रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सार्वजनिक चवदार तळ्याचा सत्यागृह करून आपल्या दलित बांधवाना पाणी पिण्याचा आधिकार मिळवून देवून चवदार तळे खुले केले तो दिवस म्हणजे पाण्यासाठी उभारलेला जगातला पहिला लढा महाड चवदार तळ्याचा मुक्ती संग्राम दिन होय . या प्रसंगी पाडूरंग लोखंडे बाबुराव माने भिमराव गायकवाड दिनकर कांबळे इंद्रजीत लोखंडे ब्रबुवान सोनकांबळे यशवंत लोखंडे साई गायकवाड नारायण लोखंडे सह युगपुरुष तरुण मंडळाचे सर्व भिमसैनिक बौद्ध उपासक उपासीका मोठ्या संख्याने हजर होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुत्रसंचलन सतीश माने यांनी केले . आभार रोहीत माने यांनी मानले

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!