मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह दिनानिमित्त उमरगा येथे एक दिवसाचे समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबीर संपन्न .

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया [ आर्थात ] भारतीय बौद्ध महासभा उमरगा तालुका शाखेच्या वतीने समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
२० मार्च हा ९७ वा महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह हा बौद्ध शोषित पीडित बहुजन वर्गातील नागरिकांसाठी क्रांतीकारी दिवस म्हणून संपूर्ण विश्वात गणला जातो
या दिनानिमित्त दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा उमरगा तालुका शाखेच्या वतीने एक दिवसीय समता सैनिक दल प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते,
यावेळी प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुज्य भंत्ने सुमंगल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली,यावेळी समता सैनिक दलाच्या सर्व सैनिकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरचिटणीस किरण कांबळे होते या शिबीराचे उद्घाटन पुज्य भन्ते सुमंगल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी फुले शाहु आंबेडकर चळवळीतील साहित्यिक प्रा किरण सगर यांचा त्यांच्या सेवानिवृत्त बद्दल सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास जिल्हा कोषाध्यक्षा राजश्रीताई कदम पर्यटन विभाग उपाध्यक्ष विश्वास भाऊ पांडागळे ,जिल्हा कार्यालयीन सचिव दादासाहेब बनसोडे, लोहारा उपाध्यक्ष सुनील भालेराव , दिलीप गायकवाड जालिंदर कांबळे, ब्रम्हाणंद गायकवाड , यांच्या सह कदेर, औराद, एकुरगा,तूगाव, तुरोरी, बडुर, आलुर , वागदरी या गावातील महिला व पुरुषानी मोठया प्रमाणात सहभाग नोंदविला या प्रश्नाचे प्रशिक्षणासाठी भारतीय बौद्ध महासभेचे पुणे येथील मेजर केद्रिंय शिक्षक ॲड अनिल सतीश कांबळे सर्व प्रशिक्षण देण्यासाठी आले होते त्यांना सहाय्यक म्हणून राजरत्न बनसोडे यांच्या सह सैनिक शिबिरासाठी उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते,
सुत्रसंचलन शिवानंद भंडारे यांनी केले, प्रास्ताविक तालुका अध्यक्ष संतोष सुरवसे यांनी केले आभार तालुका उपाध्यक्ष राजेंद्र सुर्यवंशी यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आंनद कांबळे, अविनाश भालेराव,रुपेश कांबळे, उध्दव गायकवाड, जीवन सुर्यवंशी, महेश सुर्यवंशी, बलभीम गायकवाड आरुणा सुरवंशी, लताताई कोल्हे, विद्याताई कांबळे यांनी परिश्रम घेतले.भारतीय बौद्ध महासभेच्या या समता सैनिक दल प्रशिक्षणा साठी महिला व पुरुषांनी खुप मोठा सहभाग नोंदविला आणि प्रशिक्षण खूप चांगले झाले नाही सैनिकांनी समाधान व्यक्त केले

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!