भाजपा चे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडी युरप्पा यांच्यावर पॅाक्सो अंतर्गत गुन्हा दाखल..

भाजपा चे ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, फोडाफोडी करून सत्ता स्थापन करण्याच्या राजकारणाची ज्यांच्यापासून मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असे बी. एस. येडियुरप्पा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्यावर सदाशिव नगर पोलीस स्टेशन मध्ये पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
17 वर्षाच्या मुलीच्या आईने लैंगिक अत्याचारांच्या केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
2 फेब्रुवारी 2024 या दिवशी जेव्हा आई आणि मुलगी एका फसवणुकीच्या प्रकरणात माजी मुख्यमंत्र्यांकडे मदत मागण्यासाठी गेल्या होत्या तिथे त्या ठिकाणी ही अत्याचाराची घटना घडल्याची माहिती महिलेने दिली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर येडीयुराप्पा यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा त्यांच्यासाठी आणि पक्षासाठी अडचणीचा ठरू शकतो.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत