रिपब्लिकन पक्षाचे नेते अँड सखाराम मेश्राम यांचा जन्म दिवस

विनायकराव जामगडे
परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या चळवळीत सक्रिय सहभाग घेऊन चळवळ मजबूत करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्यात अँड सखाराम मेश्राम यांचा सिंहाचा वाटा आहे. समाज अशिक्षित होता.समाजात मोजके लोक शिकले होते.समाजाची सेवा करता यावी म्हणून वकीलीचा व्यवसाय स्विकारून अस्पृश्य समाजावर होणा-या अन्याय अत्याचारा विरूद्ध कायदेशीर लढाई लढण्याचा व अस्पृश्य समाजातील लोकांना धीर देण्याचे काम सखाराम मेश्राम यांनी केले.. शेड्युल कास्ट फेडरेशन पासून रिपब्लिकन पक्ष संघटित करण्यासाठी खूप कष्ट उपसले. कार्यकर्त्याला सर्व दृष्टिने मदत करत असत त्यांची हिंमत वाढविण्यासाठी सभास्थळी जातीने हजर राहून मदत करित असत.
1949ला ग म ठवरे यांना पक्षातून काढल्या नंतर काही पक्षाचे कार्यकर्ते ठवरे यांच्या नादी लागले होते.
अँड सखाराम मेश्राम यांनी जोगी नगर नागपूर येथे सभा घेतली.व समता सैनिक दलाचे सैनिक व आखाड्यातील पहेलवान यांना सोबत घेऊन आंबेडकरी चळवळीला सोडून जाणाऱ्या बाबूळखेडा येथिल लोकांना धडा शिकविण्याचा कार्यक्रम ठरला. उन्हाळ्याचे दिवस होते. लोक घराबाहेर झोपले होते. मध्य रात्री हमला करून त्यांना मारले.व दम दिला की आंबेडकरी चळवळ सोडून गेले तर याच्यापेक्षा जास्त मारू येथिल लोक हात जोडून माफी मागितली.
दलित पँथरची सभाइदोरा चोक जिथे राजाभाऊ खोब्रागडे यांचा पूतळा तेथे सभा आयोजित होती. नामदेव ढसाळ राजाभाऊ खोब्रागडे बद्दल अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करिता होते त्यावेळी युवराज गायकवाड व श्याम डोंगरे यांनी सभा उधळली.दोघानाही पोलीसांनी अटक केली . सखाराम मेश्राम रिक्षात बसून हे दृष्य पाहत होते. त्यांनी पोलीस स्टेशन पाचपावली ला जाऊन दोघांची सुटका केली.ते कार्यकर्ते सोबत असतं.ते नागपूर महानगरपालिका चे स्थायी समिती चे अध्यक्ष वमहपौर पद भूषविले आहे हे रिपब्लिकन पक्षाचे नेते सखाराम मेश्राम याचा25/9/1916हा जन्म दिन त्यांना विनम्र अभिवादन
विनायकराव जामगडे 7823093556
9372456389
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत