मुख्य पान

गणपती मंडपात नाचता नाचता तरूणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.


सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून गणपतीच्या कार्यक्रमात नाचता नाचता तरूणाचा मृत्यू झाला आहे.लग्नात डान्स करताना,चालता चालता, जीममध्ये व्यायाम करताना आणि गाणी गातानासुद्धा अनेकांना हृदयविकाराचा झटका आल्याचे धक्कादायक प्रकार घडले आहेत. तर सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन तरूण गणपतीच्या कार्यक्रमात एका गाण्यावर डान्स करत आहेत. डान्स करता करता त्यातील एक तरूण अचानक कोसळतो आणि त्याचा काही क्षणात हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू होतो.
दरम्यान, ही घटना आंध्रप्रदेश येथील असल्याची माहिती समोर आली असून हा तरूण २६ वर्षांचा असल्याचं बोललं जातंय. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. कोरोना काळानंतर अनेक तरूणांचे अशा प्रकारे जीव गेले असल्याचंही मत नेटकऱ्यांनी व्यक्त केलंय. “कोण कधी जाईल ते सांगता येत नाही त्यामुळे काळजी घ्या आणि सर्वांशी प्रमाने वागा” अशा कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केल्या आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!