खान्देशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

महसूल मंत्री विखेंसाहेब, समस्याग्रस्त लोकांना भेटा!

  महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अचानक जळगावला आले.काम काहीही असो पण मंत्री ने महसूल खात्याची जबाबदारी घेतली तर काम केलेच पाहिजे.आम्ही अनेक वेळा या मंत्री कडे भेटीसाठी अपील केले.कि जामनेर भुमिअभिलेख खात्यांत मोठा भ्रष्टाचार आणि कामचोरी चालू आहे.त्यामुळे शेतकरी हैराण आहेत.तर आपण एकदा जामनेर ला भेट द्यावी.किंवा आम्हाला भेटीची वेळ द्यावी.
   महसूल मंत्री जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे येत असल्याचे लोकमत पेपर ला वाचले.मंत्रीचे असे अचानक येणे आणि निघून जाणे चुकीचे आहे.जळगांव जिल्ह्यात आला आहात येथील शेतकरी समस्यांना हात घातला पाहिजे.जर तसे करीत नसाल तर आम्ही जळगाव धरणगाव दौऱ्याचा काय अर्थ घ्यावा? महसुल खात्यातील अवैध वसुली चे हफ्ते तर तुमच्या घरी येऊ शकतात.पण तुम्ही येथे आला आहात तर आम्हाला भेट दिलीच पाहिजे.तुमच्या खात्यातील भ्रष्टाचार बाबत आमची शेतकऱ्यांची तक्रार ऐकलीच पाहिजे.
 विखे पाटील आपण जर मंत्री पदाची जबाबदारी घेऊन बेजबाबदारपणे वागत असाल तथ चुकीचे आहे.आम्ही याबद्दल जाहिर निषेध व्यक्त करतो.
नगर जिल्ह्यातील बाळासाहेब थोरात महसूल मंत्री असताना सुद्धा ते असेच गुपचूप जळगाव जिल्ह्यात येत असत.आणि गुपचूप निघून जात असत.जर विखे सुद्धा तसेच वर्तन करीत असतील तर नगर जिल्ह्यातील सर्वच आमदार खासदार मंत्री भ्रष्टाचारी असावेत.नालायक असावेत.असा आम्ही निष्कर्ष काढतो.
   तात्पर्य, महसूल मंत्री विखे पाटील यांनी जळगाव किंवा धरणगाव येथे आम्हाला भेट द्यावी.जर वेळ नसेल तर आम्हाला तुमच्या मतदारसंघात भेट निश्चित करावी.जर इतकाही प्रामाणिकपणा नसेल तर आम्ही विखेंचा धिक्कार करतो.निषेध करतो.

… शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!