मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभेकडून महिलांचा सन्मान

उस्मानाबाद : 8 मार्च 2024 रोजी सायंकाळी सात वाजता जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सिद्धार्थ बुद्धविहार, सिद्धार्थ नगर सांजा रोड उस्मानाबाद येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सर्वसामान्य महिलांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी माता सावित्रीबाई व माता रमाई यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्ष विजयमाला धावारे,जिल्हा सरचिटणीस विद्यानंद वाघमारे,उपाध्यक्षा शीलाताई चंदनशिवे,जिल्हा संघटक मीनाताई लागाडे,तालुकाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे,ता.संघटक अंजनाताई गजधने यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

जागतिक महिला दिना निमित्ताने भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक विजय अशोक बनसोडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना “उठा सज्ज व्हा” ही एक प्रबोधनात्मक कविता सादर केली. तसेच जागतिक महिला दिनाच्या औचित्याने उपासिका आशाताई रोकडे,सविता हनवते,
दीक्षाताई लांडगे,आशा कठारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यानंद वाघमारे यांनी केले तर शेवटी उपस्थित महिलांना पेढे वाटून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी दीक्षाताई लांडगे,सुमन गायकवाड,सविता हनवते,पुष्पा गायकवाड,आशा रोकडे,आशा कठारे,रोहिणी वाघमारे,अनिता गायकवाड,लिंबाबाई वाघमारे,कमल वाघमारे,शारदा कांबळे,जयश्री सुरवसे, वैशाली सगर,विमल कसबे, कोरकेताई,शाहूबाई बीडबाग,आशा गायकवाड,शालिनी सातपुते, सोनाली सोनवणे,कोमल सपकाळ, अनुसया कांबळे,चंद्रकांत गायकवाड, प्रशांत साबळे यांच्यासह सिद्धार्थ नगर मधील तरुण मंडळ व महिला उपासीका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!