आर्थिकउद्योगमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनांसाठी 11 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करा..

कोल्हापूर ता.६: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), मुंबई व राष्ट्रीय अनुसुचित जाती वित्त विकास महामंडळ, दिल्ली यांच्यामार्फत मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील दरिद्रय रेषेखालील व गरजू घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी, तसेच त्यांना स्वंयरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करुन देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. या कर्ज योजनांचा लाभ घेण्यासाठी 7 फेब्रुवारी 2024 पासून सुरुवात करण्यात आली आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज 11 मार्च 2024 पर्यंत https://beta.slasdc.org या संकेतस्थळावर सादर करावेत, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर.एच. चव्हाण यांनी केले आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), मुंबई व राष्ट्रीय अनुसुचित जाती वित्त विकास महामंडळ, दिल्ली यांच्यामार्फत सुविधा कर्ज योजना-कर्ज मर्यादा रक्कम रु. ५ लाख, लघु ऋण वित्त योजना-कर्ज मर्यादा रक्कम रु.१.४० लाख, महिला समृध्दी योजना-कर्ज मर्यादा- १.४० लाख व शैक्षणिक कर्ज योजना-कर्ज मर्यादा देशांतंर्गत अभ्यासक्रमासाठी- रक्कम रु. ३० लाख व परदेशातील अभ्यासक्रमासाठी रक्कम रु. ४० लाख याप्रमाणे योजना सुरु करण्यात येणार असून त्यानुसार जिल्हा कार्यालयांना उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या योजनांची माहिती महामंडळाच्या slasdc.org या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!