उद्योगमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यांच्यात महत्त्वपूर्ण करार.

झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाला चालना देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज महत्त्वपूर्ण करार करण्यात आला. माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर इथल्या सुमारे १५ हजार घरांचा पुनर्विकास करण्यासाठी मंत्रालयात झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत हा करार झाला. यावेळी इतर महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांबरोबरच वांद्रे कुर्ला संकुलात पॅाड टॅक्सी प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर करायला मुख्यमंत्र्यांनी यावेळी मान्यता दिली. यावेळी मंत्री शंभूराज देसाई, आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध रस्ते प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. एमएमआरडीएमार्फत विशेष प्रयोजन वाहन कंपनीची स्थापना करायला यावेळी मान्यता देण्यात आली. पैठण इथल्या संत ज्ञानेश्वर उद्यानाचा आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याबाबतही आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक झाली. या कामासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!