माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाची गिनीज बुक मध्ये नोंद.

मुंबई : राज्यात एकीकडे हजारो शाळा बंद करण्याचा किंवा भाडे तत्वावर देण्याचा घाट चालू असताना राज्य सरकार “माझी शाळा सुंदर शाळा” अभियानाची जाहिरात करून स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. नुकत्याच राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाचे पुरस्कार काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या अभियानादरम्यान राबवण्यात आलेल्या तीन उपक्रमांची ‘गिनीज बुक मध्ये नोंद झाली, याबद्दल, मुख्यमंत्र्यांनी सर्वांचं अभिनंदन केलं.
या विक्रमांमध्ये १३ लाख ८४ हजार ४२६ विद्यार्थ्यांनी ‘वाचन सवय प्रतिज्ञा’ घेणं, ११ लाख २० हजार ३८६ विद्यार्थ्यांनी २४ तासांच्या कालावधीत शिक्षण विषयक हस्तलिखित अभिप्राय आणि फोटो बेसपोक प्लॅटफॉर्मवर अपलोड करणं, तसंच शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा वाचनाचं महत्त्व सांगणारा यूट्यूब वरचा व्हिडीओ, एकाच वेळी एक लाख ८९ हजार ८४६ विद्यार्थी आणि पालकांनी लाईव्ह पाहणं, या उपक्रमांचा समावेश आहे. पुरस्कारप्राप्त शाळांमध्ये नांदेड जिल्ह्यातल्या सगरोळी इथल्या छत्रपती शिवाजी हायस्कूल तसंच छत्रपती संभाजीनगर इथल्या भोंडवेपाटील शाळेचा समावेश आहे.
एकीकडे सरकार महाराष्ट्रातल्या हजारो शाळा बंद करत आहे आणि असे उपक्रम राबवून राज्याची शैक्षणिक अधोगती झाकून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे अशी बुद्धिजीवी वर्गात चर्चा रंगली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत