महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंत रविदास महाराजसामाजिक / सांस्कृतिक

संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज लेख शृंखला – ९

गुरू रविदास जयंती निमित्त पुष्प ९ वे..

रविदास उपिजइ सभ इक बुंद ते,का बामन का सुद!
मुरिख जन न जानइ, सभ मंह राम मजूद!!

गुरू रविदास म्हणतात हे सर्व जगच एका थेंबा पासून उत्पन्न झाले आहे.मग ब्राम्हण शुद्र भेद कश्याला करायचा ? या थेंबाला ते ब्रम्हथेंब संबोधतात. हा ब्रम्हथेंब म्हणजे देवकण… ! ही सृष्टी एका देवकणाच्या थेंबाचा विस्तार आहे. त्या कारणाने जगातील सर्व मानव प्राणी एक समान आहेत. आधुनिक विज्ञानाने देवकणाचा म्हणजे या थेंबाचा शोध घेतला आहे. त्याला इंग्रजीत God particles म्हणतात. हा थेब मूलतत्त्व अणुरेणू इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन युक्त आहे.गाॅड पार्टिकल प्रयोगशाळेत पडताळून पाहता येतो. रविदास महाराजानी तेराव्या शतकात जगाच्या जन्माचे रहस्य उलघडून ज्यात दाखवले आहे . तो हा दोहा आहे. …!
विज्ञानआणि अध्यात्म भौतिक व मानसीक समस्यांवर उपाय शोधत असते…पण अज्ञानामुळे ते जनसामान्यांना समजत नाही.कुंभार जसा एकाच मातीतून अनेक भांडी तयार करतो .तसे सृजनहाराने (रामाने) एकाच थेंबातून ही चित्र विचित्र सृष्टी तयार केली आहे.कुंभाराची मातीची भांडी अनेक आहेत पण जशी माती एकच आहे तसे सृष्टीतील चराचर अनेक आहेत .पण रचेता एकच आहे.आणि तो रचेता आहे राम .

रविदास हमारो रामजी,दशरथ करि सुत नाही!.

गुरुजी सांगतात कि राजा दशरथाचा पुत्र राम माझा राम नाही. त्या रामाचाही देव श्रीराम जो सर्व व्यापक आहे. तो माझा राम आहे..!!

जय रविदास …!
लेखक,अँड , आनंद गवळी..
राष्ट्रीय चर्मकार महासंघ. राष्ट्रीय उपाध्यक्ष

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!