सम्यक अकॅडमीची विद्यार्थिनी प्राजक्ता रत्नदीप कांबळे हिची शिक्षक पात्रता अभियोग्यता परीक्षेच्या माध्यमातून शिक्षिका पदी निवड.

सोलापूर प्रतिनिधी : सम्यक अकॅडमीची विद्यार्थिनी प्राजक्ता रत्नदीप कांबळे हिची शिक्षक पात्रता अभियोग्यता परीक्षेच्या माध्यमातून शिक्षिका पदी निवड झाल्याबद्दल आज अकॅडमी मध्ये सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून वसुंधरा महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य मीना गायकवाड, बहुजन शिक्षक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर, लोकराजा फाउंडेशनचे अध्यक्ष आशुतोष तोंडसे हे उपस्थित होते.
अकॅडमीच्या वतीने प्राजक्ताचा आई-वडिलांसह सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकॅडमीचे मार्गदर्शक राज्यकर निरीक्षक बुद्धजय भालशंकर यांनी केले. सूत्रसंचालन ज्योती चव्हाण यांनी तर कृपा जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत