
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूरमधून एका वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, यावेळी दोन कबड्डीपटूंमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडीओमध्ये कार्यक्रमात दोन संघांतील खेळाडूंमध्ये कशावरून तरी वाद झाला आणि त्यानंतर हा वाद इतका वाढला की, दोन्ही संघांमधील खेळाडूंमध्ये हाणामारी झाली.
काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, चुकीच्या पद्धतीने खेळल्यामुळे या दोन कबड्डी संघांच्या खेळाडूंमध्ये मारामारी झाली. यावेळी दोन्ही संघांतील खेळाडू काही मुद्यांवरून एकमेकांबरोबर भांडताना दिसले. यावेळी त्यांच्या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाल्याचे बोलले जात आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लाथा-बुक्क्यांचा वर्षाव सुरू झाला. अनेक खेळाडूंनी कार्यक्रमासाठी ठेवलेल्या खुर्च्या उचलून एकमेकांवर फेकण्यास सुरुवात केली. या संपूर्ण घटनेमुळे एक प्रकारे गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी कार्यक्रमात सहभागी झालेली सर्व मुले घाबरून कार्यक्रमातून पळून गेली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत