‘महाविकास आघाडीच्या बैठकांना जाऊ नका’ प्रकाश आंबेडकर
लोकसभा निवडणुकांसाठी काही दिवसांचा वेळ उरला असताना प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीची अद्याप महाविकास आघाडीसोबत जाण्याबाबत चर्चाच सुरु. जागावाटपासाठी ठेवलेल्या अटींमुळे ही युती थांबल्याचे बोललं जात आहे. यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत सातत्याने चर्चा सुरु आहेत. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आवाहन केलं आहे.
वंचित बहुजन आघाडीने 27 जागांवर लढण्याची तयारी केल्याचे पत्र महाविकास आघाडीतल्या नेत्यांना दिले होते. मात्र वंचितची जागांची मागणी पाहता तिन्ही पक्षांचे गणित बिघडू शकते. त्यामुळे मविआच्या नेत्यांकडून अद्यापही कोणती घोषणा केलेली नाही. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांनीही व्हिडीओद्वारे वंचित बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत