एकच साहेब बाबासाहेब

प्राचार्य वसंत वावरे.
बाबासाहेबांना वर्तमानपत्रे अत्यंत गांभीर्याने वाचायची संवय होती. स्नानानंतर जेव्हा ते जेवणाच्या खोलीत तेव्हा अनेक वर्तमानपत्रे त्यांच्यासोबत असत.वर्तमानपत्रातील महत्त्वाचा मजकूर अधोरेखित करण्यासाठी लाल पेन्सिल जवळ असायची. वर्तमानपत्रातील एकही महत्त्वाची घटना त्यांच्या तिक्ष्ण नजरेतून सुटत नसे.कात्रणे जतन करण्याचं काम देवी दयाल यांच्याकडे असे. बाबासाहेबांनी एखादे कात्रण मागितल्यास जराही वेळ न दवडता देवी दयाल ते कात्रण बाबासाहेबांसमोर हजर करत असे. देवी दयाल हे अगदी तरुण वयापासून बाबसाहेबांशी जोडलेले होते. बाबासाहेबांच्या ग्रंथालयाची जबाबदारी देवी दयाल यांच्याकडे होती.
१९०७ पासूनच्या वर्तमानपत्रातील कात्रणे बाबासाहेबांच्या संग्रही होती. आश्चर्य म्हणजे प्रत्येक कात्रणं बाबासाहेबांच्या स्मरणात होते.
१९४४ साली त्रावणकोरचे दिवाण सर सी. पी. रामास्वामी बाबासाहेबांच्या भेटीला आले.बाबासाहेब देवी दयाल यांना म्हणाले,”दयाल, हे रामास्वामी एकदा अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशाच्या विरुद्ध बोलले होते याची मला खात्री आहे. वर्तमानपत्रात आलेल्या त्यांच्या भाषणाचे कात्रण मी कापून ठेवले होते. ते कात्रण शोधून ठेव.”
देवी दयाल- बाबासाहेब, ही साधारण कधीची गोष्ट आहे ?
बाबासाहेब -साधारण बारा वर्षे झाली. मी ते कात्रण एका कापडी पिशवीत ठेवले होते. ते कात्रण अगदी लहान साधारण ३ इंचाचे आहे.
बाबासाहेबांनी जसे वर्णन केले तसेच एका कापडी पिशवीत ते कात्रण सापडले.देवी दयाल तर थक्क झाले. ते कात्रण वाचल्यावर बाबासाहेब देवी दयाल यांना म्हणाले,”मी म्हणालो होतो की नाही की हा लबाड दिवाण एकेकाळी मंदिर प्रवेशाच्या विरुद्ध होता.”
हे अगदी खरं होत.१९३२ साली महात्मा गांधी यांनी गुरुवायूर मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्याचा मुद्दा धरला होता तेव्हा याच सी. पी. रामास्वामीने विरोध केला होता.
प्राचार्य वसंत वावरे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत