जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोरवडी येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोरवडी येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
बुधवार,दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,खोरवडी.ता.दौंंड,जि.पुणे येथे राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते.या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग, प्रतिकृती तयार करुन त्याचे उत्तम सादरीकरण केले.या विज्ञान प्रदर्शनास शाळा व्यवस्थापन समितीच्या माजी अध्यक्षा सौ.शितलताई सोनवणे , इतर पालक व ग्रामस्थांनी भेट देऊन बालवैज्ञानिकांचे भरभरुन कौतुक केले.या उपक्रमामुळे निश विद्यार्थ्यांच्या मनातील कुतुहल व वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत होण्यास मदत मिळेल.
सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक गौतम कांबळे सर,उपशिक्षक अभिजीत कोंडेजकर सर,हौशीराम गायकवाड सर,श्रीमती नीता भद्रे मॅडम, श्रीमती शितल कदम मॅडम, श्रीमती साक्षी कोंडेजकर मॅडम व सर्व विद्यार्थ्यांचे अनमोल असे सहकार्य लाभले.मुख्याध्यापक गौतम कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत