कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 9 नोव्हेंबरपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज तर पहाटेपासून कोल्हापूर शहर आणि परिसरात मुसळधार पावसाने लावली हजेरी.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण होते. तसेच राज्यातहि गेल्या 3-4 दिवसांपासून ढगाळ वातावरण दिसत आहे.
सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत पुढील दोन दिवस हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात 10 नोव्हेंबरपासून थंडीत वाढ होईल, असा अंदाज आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 9 नोव्हेंबरपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पहाटेपासून कोल्हापूर शहर आणि परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत