महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणसामाजिक / सांस्कृतिक

शिवजयंतीची तारीख संशोधकांनी निश्चित केल्यामुळे शिवजयंती तारखेप्रमाणेच साजरी करावी.

रयतेच्या स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्रासह भारतभर 19 फेब्रुवारीला साजरी केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार, फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (१९ फेब्रुवारी १६३०) रोजी जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ आणि शहाजी राजेंच्या घरात शिवाजी महाराजांचा जन्म झाला. संपूर्ण देशात मुघलांची सत्ता होती त्या काळी शिवरायांचा जन्म झाला आणि त्यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार केला. महाराष्ट्रातील प्रत्येक शिवभक्तासाठी हा दिवस एखाद्या उत्सवाप्रमाणे असतो. गेल्या काही वर्षांमध्ये शिवजयंती मोठ्या जल्लोषामध्ये साजरी केली जात आहे. १८६९ मध्ये महात्मा फुले यांनी रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि त्यानंतर १८७० मध्ये पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली गेली.

राज्य सरकारने संशोधक तज्ञाची एक कमिटी त्या कमिटीच्या शिफारशीनुसर २००१ मध्ये १९ फेब्रुवारी १६३० ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली. त्यामुळे तारखेला मान्यता देणारा ग

१९ फेब्रुवारीच्या दिवशी शिवजयंती आहे असे मानतो. पुढे ब्रिटिशांविरोधात भारतीय जनमानसामध्ये एकी निर्माण व्हावी, यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवासह सार्वजनिक शिवजयंतीच्या प्रथेची सुरुवात केली. १८९५ मध्ये पहिल्यांदा शिवजयंतीचा उत्सव सार्वजनिकरीत्या साजरा केला गेला.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!