मराठवाडामहाराष्ट्रसामाजिक / सांस्कृतिक

भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा तुळजापूर च्या वतीने समता सैनिक दल शिबिर संपन्न..

रविवार दिनांक 18/2/2024 रोजी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा तुळजापूर च्या वतीने मौजे केशेगाव येथे आयु. रामेश्वर चंदनशिवे – तुळजापूर तालुका अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली समता सैनिक दलाचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले.

शिबिरास मेजर अनिल कांबळे यांच्या प्रमुख उपस्थिती सह धाराशिव जिल्हा कोषाध्यक्ष राजश्री ताई कदम, समता सैनिक दल उपाध्यक्ष अनिल सरतापे, केंद्रीय शिक्षक गुणवंत सोनवणे सर, संस्कार उपाध्यक्ष बाळासाहेब बागडे, संस्कार सचिव कुमार ढेपे, तालुका सरचिटणीस विठ्ठ्ल सुरते यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

मेजर अनिल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या शिबिरास महिलांचा सहभाग अधिक होता. 21 महिला व 4 पुरुषांनी या शिबिरात सहभाग नोंदविला. मोठ्या उत्साहात शिबिर पार पडले व तालुका शाखेच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!